Untitled Document

ययाति

ययाति ! ही वि .स .खांडेकर यांची प्रसिद्ध आणि अतिउत्कृष्ट कादंबरी. याच कादंबरीला १९७४ साली भारतीय ज्ञानपीठाचा "वाग्देवी" पुरस्कार मिळाला .

ही कादंबरी , हस्तिनापूर मधील एका पौराणिक कथेवर आधारित ययाति, देवयानी, कच आणि शर्मिष्ठा या चार व्यक्तिरेखांवर लिहिली आहे .

राजा नहुष चा कामुक , स्त्रीलंपट मुलगा ययाति , राक्षस गुरु शुक्राचार्य यांची रूपवती ,महत्वाकांक्षी , लाडावलेली आणि गर्विष्ठ कन्या "देवयानी" , संजीवनी विद्या शिकण्यासाठी आपल्या जिवाची पर्वा न करता दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या आश्रमात जाणारा संयमी ,सद्विवेकी,आंङ्गिरस ऋषी यांचा शिष्य "कच" , ययाती वर निरपेक्ष प्रेम करणारी दैत्यांचा राजा वृषपर्वा याची कन्या "शर्मिष्ठा" अशा या चार व्यक्तिरेखा खांडेकरांनी अतिशय समर्थपणे साकारल्या आहेत .

कच आणि ययाति यांची मैत्री ही , आंङ्गिरस ऋषी यांच्या आश्रमात होते . त्यावेळी देव आणि दानव यांच्यात युद्धाची खुमखुमी सुरु असते. अशातच दैत्य गुरु शुक्राचार्य हे भगवान भोलेनाथ यांना प्रसन्न करून संजीवनी विद्या प्राप्त करतात त्यामुळे दैत्यांचा उन्माद अधिक वाढतो . देवांचा होणारा पराभव रोखण्यासाठी , आंङ्गिरस ऋषींचा शिष्य , "कच" दैत्य गुरु शुक्राचार्य यांच्याकडे संजीवनी विद्या शिकायला जातो . कच ची गुरुनिष्ठा , संयमी आणि ध्येयवादी स्वभाव पाहून शुक्राचार्यांची लाडवलेली रूपवती कन्या देवयानी हिचे कच वर प्रेम होते परंतु गुरुकन्या ही बहिणीसमान मानून कच देवयानीला नाकारतो.

शुक्राचार्य हे राजा वृषपर्वा यांच्याकडे राहत असतात आणि शर्मिष्ठा आणि देवयानी ह्या बालमैत्रीण असतात पण आपल्या गर्विष्ठ स्वभावामुळे देवयानी सतत शर्मिष्ठेचा द्वेष करत असते . अशातच एकेदिवशी मृगये ला आलेल्या राजा ययाति आणि देवयानी ची भेट होते आणि प्रत्ययी त्याचे रूपांतर लग्नात होते . परंतु एके दिवशी शर्मिष्ठा आणि देवयानी यांच्यातला वाद विकोपाला जातो आणि हे सगळं देवयानी शुक्राचार्य यांना सांगते , एकुलती एक मुलगी आणि तिचा झालेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी शुक्राचार्य वृषपर्वा राजाचे राज्य सोडून जायला निघतात . त्यामुळे घाबरलेला वृषपर्व शुक्राचार्यांना थांबण्यास विनंती करतो , परंतु मुलीच्या प्रेमात आंधळे झालेले शुक्रचार्य देवयानीची इच्छा पूर्ण करण्याची आज्ञा वृषपर्वा ला सांगतात आणि ती पूर्ण झाली तरच मी या राज्यात थांबीन अशी प्रतिज्ञा करतात .

मानतील द्वेष पूर्ण करण्यासाठी देवयानी शर्मिष्ठेला आपली दासी म्हणून हस्तिनापूर ला येण्याची आज्ञा राजा वृषपर्वा ला करते आणि राज कर्तव्यामुळे त्याला हे करावं लागतं . परंतु नियतीने देवयानी सोबत हिच्या ताटात काही औरच वाढून ठेवले होते.

ज्या सौन्दर्याला भुलून ययाति ने देवयानीशी लग्न केले ते अंतिम सुख ययातिला देवयानीकडून कधीच मिळाले नाही आणि देवयानी सुद्धा आपल्या महत्वाकांक्षेमुळे ययाति पासून नकळत का होईना पण दूर जात होती . परंतु शर्मिष्ठा हिला राजा ययातिची तळमळ कळत होती पण दासी असल्याने तिला हे कुठेच ययातीशी बोलता येत नव्हते . शेवटी एके दिवशी देवयानी माहेरी गेली असतांना , शर्मिष्ठा ययाति समोर आपल्या आत्मिक प्रेमाला आणि भावनांना वाट मोकळी करून देते. ज्याची मोठी शिक्षा ययाति , शर्मिष्ठा आणि देवयानी या तिघांना भोगावी लागली .

प्रस्तुत कादंबरी ही ययातिची कामकथा आहे, देवयानीची संसारकथा आहे. शर्मिष्ठेची प्रेमकथा आहे आणि कचाची भक्तिगाथा आहे, हे लक्षात घेऊन वाचकांनी ती वाचावी,' अशी अपेक्षा स्वत: खांडेकरांनीच प्रकटपणे व्यक्त केली आहे.

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document