Untitled Document

रिच डॅड पुअर डॅड

रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक रॉबर्ट टी. कियोसाकी यांनी पैसे आणि त्यासंबंधी गुंतवणूक कशी करावी यावर लिहिलं आहे . पुस्तकाची भाषा हि अतिशय सोपी आणि सरळ आहे . आर्थिक गुंतवणूक ,पैसा वरून पैसा तयार होणे आणि त्यातून मिळणारा नफा ह्या गोष्टी ९० टक्के लोकांना अवघड वाटतात किंवा ते समजण्यापलीकडे आहे असे समजतात .

सामान्यतः मध्यम वर्गीय समाजात आपल्याला लहानपणापासून म्हणजे अगदी शालेय जीवनापासून हेच शिकवल्या जातं की चांगलं शिक्षण घ्या , पदवीधर व्हा ! आणि एखादी छान नोकरी करून कुटुंब चा उदरनिर्वाह करा . या सगळ्यात पैसा हा माणसाला आयुष्यभर नाचवतो आणि जणू त्यासाठीच माणूस काम करत असतो . जेव्हा की ही, परिस्थिती नेहमी उलट असावी आपण पैशासाठी काम आवश्यक तेवढंच करावं बाकी आपल्या जवळ असलेल्या पैसा नी आपले सगळे कामं केले पाहिजेत .

वर्तमान परिस्थिती मध्ये लोकं हे खाजगी कंपनी मध्ये काम करत असतात त्यात पेन्शन हा प्रकार नाही तसेच नोकरीची पण हमी नाही अशावेळेस नोकरीच्या सुरुवातीपासून योग्य ती गुंतवणूक करणं किती गरजेचं आहे आणि ती कशी करता येईल हे यात लेखकाने योग्य प्रकारे समजावून सांगितले आहे . पुस्तकात सांगितलेला एक मुद्दा मला प्रामुख्याने आवडला तो म्हणजे पगार आल्यावर स्वतःसाठी पैसे वेगळे काढणे आणि नंतर मग आपले देयक , घराचे आणि विम्याचे हफ्ते भरणे . म्हणजेच आपला पैसा हा आपल्याला हवा तसा वापरता यायला हवा तसेच आर्थिक अडचणीच्या वेळी सामान्य माणूस हा आपल्या बचत केलेल्या रकमेला हात लावतो ते न करता माणसाने आपला खर्च भागवण्यासाठी अधिक आणि नवे उत्पन्नाचे पर्याय शोधावे . असे अनेक युक्त्या व सल्ले या पुस्तकात सांगितल्या आहेत .

मला हे पुस्तक काही प्रमाणात आर्थिक गुंतवणुकीत मार्गदर्शक ठरलं . तसेच भविष्यात आपला पैसा कसा वापरायचा यासाठी दिशा दर्शक वाटलं .

सध्याच्या जगात ,पैसा कसा खेळता ठेवायचा यासाठी एकदा तरी हे पुस्तक निश्चित वाचावं

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document