Untitled Document

राऊ

राऊ ! ही ना.स.इनामदार लिखित कादंबरी श्रीमंत बाजीराव पेशवे (थोरले) यांच्यावर आधारित आहे . कादंबरी चा मुळगाभा हा श्रीमंत बाजीराव पेशवे , काशीबाई ( बाजीरावांच्या पत्नी) व मस्तानी यांच्यावर आधारित आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यू नंतर मराठी दौलतीची धुरा ज्यांनी समर्थपणे पेलली आणि त्याची दहशत दिल्ली पर्यंत नेली असे छत्रपतींचे प्रधान म्हणजे थोरले बाजीराव पेशवे . कादंबरी ची सुरुवात हि शनिवार वाड्यतील नवीन वास्तूच्या पूजनाने होते त्यानिमित्त घरात होणाऱ्या संवादातून त्यांच्या मातुश्री राधाबाई , बहीण भिऊबाई, अनुबाई , पत्नी काशीबाई आणि चिरंजीव नानासाहेब या पात्रांची ओळख होते . बाजीराव यांचे बंधू चिमजीआप्पा हे पण बाजीरावसारखे पराक्रमी असतात . फडावर , सदरेवर , घरात आणि राजकारणात त्यांचे चपखल लक्ष असे .

मस्तानी ही पेशव्याच्या नृत्यशाळेतील कलावंतीण - कुठल्याश्या तरी निमित्तानी तिची आणि बाजीरावांची नजरा - नजर होते आणि त्यानंतर या रणधुरंदर योध्याचं संपूर्ण जीवनपटच बदलतो . इतिहासात सर्वांना बाजीराव म्हणजे मस्तानी हे प्रेमी युगल एवढच ठाऊक आहे . पण अटकेपार ( म्हणजे आताचं अफगाणिस्तान ) इथं पर्यन्त मराठी दौलतीचा भगवा ज्यांनी फडकवला ते बाजीराव इतिहासाला अजून पण अपरिचित आहेत .

छत्रपतींचा ( शाहू महाराज यांचा ) आदेश नम्रपणे मानणारे, युद्धात आपल्या तलवारीने शत्रूवर पराक्रम गाजविणारे , निडर बाजीराव , मस्तानीच्या बाबतीत तितकेच सौम्य होते . दौलतीच्या मातब्बर सरदारांनी , आईंनी , बंधूंनी , पत्नीने समजाविले तरी पण त्यांना मस्तानीचा मोह काही केल्या सोडवेना. ज्या मुळे त्यांना या सर्व लोकांचा रोष ओढवून घ्यावा लागला . कादंबरीतील संवाद, कथानक ना .सं . इनामदार यांनी दर्जेदार लिहिले आहेत परंतु बाजीराव यांच्या पराक्रमाची, धाडसाची आणि त्यांच्या बेडर वृत्तीची कथा कुठेतरी अपूर्ण वाटते !

वाचकांनी , प्रस्तुत कादंबरी हि बाजीराव - मस्तनी यांच्या जीवनावर आधारित भावकथा समजून वाचावी .

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document