Untitled Document

पर्व

पर्व ! हे एस् . भैरप्पा यांनी महाभारतातील प्रमुख पात्रांवर लिहिलेलं पुस्तक आहे . ही कादंबरी महाभारतातील पात्रं आणि त्यांचा स्वतःशी चालत आलेला संवाद या रूपात साकारली आहे . ज्यांना महाभारतातील पात्रं आणि त्यांच्या भूमिका माहिती आहेत त्यांना हे पुस्तक वाचायला अतिशय सोपं जाईल . मूळ महाभारताचा गाभा आणि त्यातील निवडक पर्व याची सांगड घालत एस् . भैरप्पा यांनी ही कादंबरी साकारली आहे . काही ठिकाणी पुस्तकाचे संवाद हे आपल्याला महाभारतातील पात्रांची ऐकिवात असलेली बाजू सोडून दुसऱ्या बाजूचा विचार करायला भाग पाडतात. तसेच बऱ्याच वेळेस वाचतांना असा अनुभव येतो की , कुठल्याच पात्राबद्दल लेखकाला चांगली बाजू दिसली नाही. नुसतेच नकारात्मक विचार आणि भूमिका यांचा मेळ दिसतो .

ज्यांनी महाभारत कधीच वाचलं नसेल त्यांना हे पुस्तक निश्चितच उमजायला कठीण आहे . मला हे पुस्तक एस् . भैरप्पा यांच्या इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच उणे वाटतं .ज्याला वाचायची आवड आहे त्याने कादंबरी म्हणून एकदा वाचावी असं हे पुस्तक . बाकी वाचकांना ही कितपत पसंत येते हा सरते शेवटी , रसिकांच्या आवडीचा भाग आहे .

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document