Untitled Document

महाभारत

महाभारत ! हे महर्षी व्यास रचित एक श्रेष्ठ महाकाव्य संपूर्ण भारत वर्षात तसेच विश्वात सर्वश्रुत व प्रसिद्ध आहे .व्यासांनी सुरुवातीला "जय" नावाने हा ग्रंथ लिहिला नंतर या ग्रंथाचा वैशंपायन , सौती इत्यादी लोकांमार्फत प्रसार होऊ लागला . जसजसा काळ लोटत होता , या ग्रंथात अधिक भर पडत गेली आणि आधी "भारत" नंतर "महाभारत" या नावाने हा ग्रंथ साकार झाला .

भारतीय लोकमानसावर महाभारताची किती जबरदस्त मोहिनी आहे , हे वेगळं सांगण्याची गरज नाही . आजवर या महाकाव्यावर दूरदर्शन वर अनेक मालिका आल्या त्यातली पात्र साकारणारे कलावंत हे इतकी गाजले की , ८० आणि ९० च्या दशकात ते त्यांच्या पात्राच्या नावानेच समाजात प्रचलित व ओळखले जाऊ लागले . पुस्तक रूपात महाभारत आपल्या पैकी बऱ्याच जणांनी वाचले नसेल कारण आपल्याकडे एक समज आहे की , महाभारत घरात ठेवू नये . त्यामुळे घरातील वातावरण दूषित होते आणि गृहकलह पण निर्माण होऊ शकतो . पण थोडासा विचार केला तर असे कळते कि , वास्तविक ज्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण यांचा नात्याने संबंध होता त्यांना कौरव - पांडव संघर्ष टाळता नाही आला तेव्हा नुसत्या ग्रंथाने कलह होईल हा विचारच मुळी प्रश्न निर्माण करणारा आहे ?

कमला सुब्रह्मण्यम यांनी मुळ इंग्रजी मध्ये लिहिलेली कथारूप महाभारत हि कादंबरी मंगेश पाडगावकरांनी अतिशय सुंदर शब्दात मराठी मध्ये अनुवादित केली आहे . दोन खंडात असलेली हि कादंबरी महाभारतातले सगळे पर्व सोप्या , सरळ आणि रंजक सवांदाने युक्त आहेत. माझ्या सारख्याला ज्याला महाभारतातले अगदी निवडक पात्र आणि प्रसंग माहिती होते त्याला या पुस्तकाने महाभारत अगदी अलगद उलगडले .

सर्वार्थाने परिपूर्ण आणि अलौकिक अशी व्यासांची हि प्रतिभा कलियुगात माणसाला जगण्याची जीवन कहाणीच सांगते !

राजहंस प्रकाशन आणि मंगेश पाडगावकरांचं लेखन वाचकांच्या नक्कीच पसंत येईल यात तिळमात्रपण शंका नाही !

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document