Untitled Document

किमयागार

विज्ञान क्षेत्रातील आजवर घडलेल्या सगळ्या संशोधनांचा आढावा अच्युत गोडबोले यांनी "किमयागार " या पुस्तकात अतिशय सोप्या आणि रंजक भाषेत लिहिला आहे . एकाच वेळी विज्ञान क्षेत्रातल्या - "पदार्थविज्ञान ","भूगर्भशास्त्र ","भौतिकशास्त्र ", "रसायनशास्त्र " आणि "जीवशास्त्र " यात झालेले संशोधन लेखकानी अगदी तपशीलवार दिला आहे . पुस्तकाच्या शेवटी असलेली संदर्भ सूचीवर नजर टाकल्यास वाचकांसाठी लेखकाने घेतलेल्या परिश्रमांची आपल्याला जाणीव होते .

एखाद्या अवैज्ञानिक व्यक्तीला वैज्ञानिक गोष्टी अगदी सहज समजावून सांगणारं हे पुस्तक , वाचकांना विज्ञान जगतातील किमयागारांची सफर करवते . आजवर विज्ञान जगात झालेले प्रतिभावान शास्त्रज्ञ अगदी आर्यभट्ट , वराहमिहीर , अल्बर्ट आइनस्टाइन ते स्टिफन हॉकिन्स पर्यंतचा प्रवास या पुस्तकात दिसतो .

जगात कितीतरी संशोधने झाली , जी संपूर्ण मानवजातीला कलाटणी देणारी आणि हितकारक ठरली . काही प्रयोग हे विध्वंसक आणि संहारक पण ठरले आणि त्याची झळ आजपण सृष्टीला घातक ठरते आहे . सृष्टीच्या नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट जन्माला आली की त्यासोबत फायदा आणि नुकसान हे येणारच तेव्हा हे विज्ञान आपण कुठल्या कामासाठी वापरतो त्यावरच त्याचा फायदा किंवा नुकसान ठरवता येणार. पुस्तकाचा शेवट "नाही रे उजाडत" हा तर अतिशय मार्मिक समारोप. भारतीय समाजव्यवस्था आणि युवकांसाठी डोळ्यात अंजन घालणारा आहे !

माणसाचं कुठल्याही गोष्टीविषयी असणारं कुतूहल आणि ते शोधून काढण्यासाठी चालणारी धडपड म्हणजे विज्ञान !

तेव्हा या पृथ्वीवर होणाऱ्या सगळ्या हालचाली ठायी काही ना काही विज्ञान दडलं आहे का ? हे गूढ अद्याप कायम आहे , पण किमयागारांची ही धडपड वाचकांना नक्कीच पसंत पडेल यात शंका नाही !

मंगेश मोहन पंडे
४१ , "अभिराम" ,गणेश कॉलनी,
प्रताप नगर ,नागपूर -४४००२२,
दूरध्वनी - ०७१२-२२८५३६८
Untitled Document